Kite Making Activity
Mastermind Winners
Annual Function
Science Exhibition
Kite Making Activity
Mastermind Winners
Annual Function
Science Exhibition
संस्थेची स्थापना उद्दिष्टे व सध्यास्थिती :

आदिवासी सेवा समिती, नाशिक या संस्थेची स्थापना थोर स्वातंत्र्यता सेनानी, शिक्षक व सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी १ जून १९४५ रोजी केली. सामाजिक व सेवाभावी दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासून आदिवासी सेवा समितीचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

संस्थेने ज्या-ज्या भागात आपले कार्य सुरू केले, त्या भागात सर्व प्रकारच्या शैक्षणिक चळवळी प्रोत्साहित केल्या. विशेषतः सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांकडे अधिक लक्ष देण्यात आले.

सध्या संस्थेत ३ बालमंदिरे, ४ प्राथमिक शाळा, १३ माध्यमिक शाळा, २ उच्च माध्यमिक विद्यालये, १८ प्राथमिक आश्रमशाळा, १७ माध्यमिक आश्रमशाळा आणि २ कृषी तंत्रनिकेतने यशस्वीरीत्या चालवली जात आहेत. तसेच मागासवर्गीय मुला-मुलींसाठी ५९ वसतिगृहे संस्थे मार्फत चालवली जात आहेत.

आजपर्यंतच्या संस्थेच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे व वळणे :

आदिवासी व मागास जमाती स्वातंत्र्यपूर्व काळात जे जीवन कंठीत होते तसे जीवन स्वातंत्र्यानंतरही आर्थिक आणि शैक्षणिक लाभ न मिळाल्याने जगत होते आणि केवळ बहूजन समाजासमोर आदिवासी मागासवर्गीय जनतेत शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि त्यांचे जीवनमान उंचावले जावे या उदान्त हेतूने कै. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या दीपस्तंभासारख्या आधाराने आदिवासी सेवा समितीच्या कार्याची सुरुवात १ जून १९४५ रोजी केली. संस्थेने प्रथमत: मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी वसतिगृहे व व्होलंटरी शाळा सुरु करुन आपले कार्य सुरु केले.

संस्थेचे संस्थापक कै. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर संस्थेची धुरा कै. लोकनेते व्यंकटराव हिरे यांनी सन १९६१ ते १९८० पर्यत मोठ्या धडाडीने सांभाळून २० वर्षाच्या कारकिर्दीत अनेक शाखा सुरु करुन सुसज्ज अशा इमारती बांधून संस्थेचे शैक्षणिक कार्य संबंध जिल्हाभर व शेजारील जिल्ह्यात पसरविले. कै. व्यंकटराव हिरे यांच्या दुख:द निधनानंतर सन १९८० ते आजतगायत संस्थेचे सेक्रेटरी, समाज श्री. प्रशांतदादा हिरे यांनी अनेक लोक उपयोगी उपक्रम राबवून संस्थेच्या कार्याची वाटचाल हिरक महोत्सवाकडे सुरु केली आहे.

अधीक माहीती >>>>

Dowload / View Profile IN English

📸 Media Gallery