संस्थेची स्थापना उद्दिष्टे व सध्यास्थिती :
आदिवासी सेवा समिती, नाशिक या संस्थेची स्थापना थोर स्वातंत्र्यता सेनानी शि़क्षक व सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी १ जुन १९४५ रोजी केली.
सामाजिक व सेवाभावी दृष्टीने शैक्षणिक क्षॆत्रात स्वातंत्रपुर्व काळापासुन आदिवासी सेवा समिती, संस्थेचे अत्यंत महत्त्वपुर्ण योगदान राहीले आहे.
आदिवासी सेवा समिती, नाशिक ज्या-ज्या भागात आपले कार्य सुरु करील त्या-त्या भागात साधारणपणे सर्व प्रकारच्या शैक्षणिक चळवळी सुरु करणे की, ज्यामुळे शिक्षणात वाढ होईल व विषेशत: त्या भागातील लोकांच्या सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्यांकडे अधिक लक्ष दिले जाईल. संस्थेत सध्या ३ बालमंदिरे, ४ प्राथमिक शाळा, १३ माध्यामिक शाळा, २ उच्च माध्यामिक विद्दालये, १८ प्राथमिक आश्रमशाळा, १७ माध्यमिक आश्रमशाळा, २ क्रुषी तंत्रनिकेतन आज मितीस यशस्वी रित्या चालविण्यात येत आहेत. तसेच मागासवर्गीय मुला-मुलींसाठी ५९ वसतिगृह संस्थे मार्फ़त चालविण्यात येत आहेत.
आजपर्यंतच्या संस्थेच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे व वळणे :

संस्थेचे संस्थापक कै. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर संस्थेची धुरा कै. लोकनेते व्यंकटराव हिरे यांनी सन १९६१ ते १९८० पर्यत मोठ्या धडाडीने सांभाळून २० वर्षाच्या कारकिर्दीत अनेक शाखा सुरु करुन सुसज्ज अशा इमारती बांधून संस्थेचे शैक्षणिक कार्य संबंध जिल्हाभर व शेजारील जिल्ह्यात पसरविले.
